एकदा नारद मुनी विष्णू देवाकडे जाण्यासाठी निघाले होते...
प्रवासात त्यांनी बघितले की एक नरहरी नावाचा धनाड्य व्यक्ती खूपच धनाड्य होत चालला होता..
आणि दुसरा काळू नावाचा गरीब व्यक्ती ज्याच्याकडे अंगावरती फाटलेला कपडा सुद्धा नव्हता. तो दिवसेंदिवस गरीब होत चालला होता...
नारदाला गरीब माणसाची दया आली त्यांनी देवाकडे मागणी केली. की गरीब माणसाला श्रीमंत बनव.
आणि विशेष म्हणजे श्रीमंत माणसाला अजून श्रीमंत बनवू नको अशी विनंती नारद मुलींनी विष्णू देवाला केली..
विष्णू देवाने नारदजींचे म्हणणे संपूर्ण ऐकून घेतले...
त्यावर विष्णू देवाने सांगितले की तुम्ही गरीब व्यक्तीला जाऊन भेटा आणि त्याला सांगा की तू दररोज माझे स्मरण कर आणि बोल की
" धन्यवाद देवा मला तन मन धन यांनी समृद्ध केल्याबद्दल... धन्यवाद
असे दिवसभरातून अनेक वेळा त्या गरीब व्यक्तीला बोलण्यास भाग पाडा त्यानंतर मी त्याला समृद्ध करेल.....
तसेच त्याचप्रमाणे जो धनाड्य व्यक्ती आहे त्याला सांगा की माझे (म्हणजेच देवाचे) आजपासून आभार मानणे बंद कर..
मी तुमची प्रार्थना स्वीकारेल...
आणि त्याचप्रमाणे मी करेल...
ठरल्याप्रमाणे नाराज मुनी गरीब व्यक्तीकडे गेले आणि त्या गरीब व्यक्तीला सांगितले की तू आज पासून देवाचे आभार मानायचे आणि दररोज मी सांगतो तो मंत्र दररोज उच्चारायचा आणि सतत उच्चारायचा
धन्यवाद देवा मला तन मन आणि धन यांनी समृद्ध केल्याबद्दल धन्यवाद..
असे दिवसभरातून 24 वेळा स्मरण करत जा...
त्यावर गरीब व्यक्ती असला आणि नारद मुलींना म्हणाला.... उगाच माझी थट्टा करू नका... माझ्या अंगावरती फाटलेले कपडे सुद्धा नाही आणि मी कशाला त्या देवाची धन्यवाद करू.. तू गरीब व्यक्ती चिडून बोलला आणि सरळ रस्त्याने निघून गेला.....
तसेच नारद मुनी श्रीमंत व्यक्तीकडे गेले आणि त्याला सांगितले की तू आजपासून देवाचे आभार मानणे बंद कर...
त्यावर श्रीमंत व्यक्तीने नाराज मुलींना विश्लेषण केले की अहो स्वामीजी मला आजवर जे काही हवं ते ईश्वराने दिले आहे आणि त्याच्यामुळेच मी आज जिवंत आहे मी त्याला दररोज धन्यवाद दिले तरी पुरे होणार नाही...
देवाची माझ्यावर अनन्य उपकार आहे...
मी देवाचे या जन्मात तरी उपकार फेडू शकणार नाही....
त्यामुळे स्वामीजी मी देवाची धन्यवाद प्रार्थना बंद करू शकत नाही...
तुम्हाला हवं ते दान मी देऊ शकतो परंतु तुम्ही केलेली विनंती मी कधीच मान्य करणार नाही.....
यावर नारद मुनी दोघांचीही अवस्था पाहून देवाकडे पुन्हा निघून गेले...
यामुळेच तर आपण सर्वजण म्हणतो की श्रीमंत माणूस श्रीमंत होत जातो
आणि गरीब माणूस गरीबच राहतो...
याचे कारण म्हणजे तो विचाराने कधीच श्रीमंत होऊ शकत नाही...
त्यामुळे देव सुद्धा त्याला धन आणि तन हे सुद्धा त्याला देत नाही
म्हणजेच त्याला गरीबच ठेवतो....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कहानी वाचली असेल तरच लाईक करा आणि शेअर करा....